स्वप्न
स्वप्न |
पण माझ्या मनात तस काहीच नव्हतं... माझं काम झालं आम्ही घरी यायला निघालो... बस सुरु झाली.... पाऊस देखील पडत होता. बस मधून तो पावसाचा छान क्षण खूप मोहक वाटतं होता.
पावसाच्या धारा खिडकीच्या काचवरून खाली पडत होत्या... काचेवर धुक्याची ओंजळ शोभा देत होती.. तेवड्यात खूप वेगळा विचार मनात आला आणि त्या विचाराने मन च वेगळं करून टाकलं..
तो म्हणजे तिचा हात मला माझ्या हातात घेऊ शे वाटल.. पण माझी हिंमत झाली नाही.
ती माझ्या शी एवढी चांगली आहे कि अगदी मी मिठी मारावी तरी काही बोलणार नाही मग माझा तो अधिकार का नाही, हिम्मत का नाही?
तिचा विचार करत होतो. तेव्हा ती माझ्या कडे एकटक बघत होती आणि ते मला खूप वेगळं वाटलं.
मी सांगितलं प्लीज मला असं बघू नको
आणि ती हसायला लागली.. मला खूप वेगळं वाटतं होत
स्वप्न |
नुसतं तिच्या कडे बघुशे वाटतं होत आणि तिने मला बघितलं कि काही नाही म्हणून मान हलवायची...
ठरवलं आहे तिला सांगावं मला असं वेगळं का वाटतंय आज तिला सांगितलं तर ती सर्व समजून घेईल पण झालं वेगळंच तिच्याशी भांडण करून आलो..
भांडणा मध्ये ती मला म्हणाली तुझा नाराजी वर एक उपाय आहे.
मी सांगितलं काय?
ती म्हणली लग्न करून घे... मी पण म संधी नाही सोडली लगेच बोललो तू तयार आहेस का?
तिचा कडून हो पण निघाल तिने विषय बदलत बोलणं टाळलं
तिने सांगितलं मला विडिओ बघायची आहे... लॅपटॉप वर मी कडून दिला तील ती बघत होती आणि मी सोबत तिला बघत बसलो होतो.
एवढा जवळ कि तिचा श्वास देखील मला जाणवत होता.
ती अचानक बोलली एवढा जवळ येशील तर बर नाही.. मी बोललो तुला नसेल आवडत तर लांब बसतो त्यावर ती नाही बोलली आणि लाजून हसू लागली
नेमक्की काय तिच्या मनात आहे कळत नव्हतं.. तिच्या खूप जवळ जायचं मन होत पण चुकीचं आहे हे असं समजून गप राहिलो.
तिने नेहमी प्रमाणे मोबाईल घेतला आणि बघत होती आणि मी तिच्या कडे एकटक बघत होतो.
ती हसू लागली आणि मला फोटो दाखविण्या साठी ती जवळ आली. ती एवढ्या जवळ आली कि तिचा स्पर्श मला होत होता आणि तो मला हवा हवा सा वाटतं होता. मी काय करू काहीच कळत नव्हतं आम्ही एवढे जवळ असताना देखील ती अजून जवळ येत होती.
मी तिच्या डोळ्यात बघत होतो.. जणू ती सांगते आहे माझ्या असच नेहमी जवळ राहा. माझी काळजी घे.आता मला राहवत नव्हतं तिला किस कराव असं वाटू लागलं आहे.
पण हे चुकीचं आहे असं समजून गप होतो.
माझे मन आता थांबत नाहीये. मी पण तिचा जवळ जाऊ लागलो तिला ते जाणवत होत, पण ती माझ्या वागण्यावरून काही असं बोलली नाही उलट ती लाजू लागली होती.
मी आता एवढ्या जवळ पोचलो कि माझे ओले ओठ तिचा गालवर स्पर्श करत होते. आणि त्या 2 3 सेकंदात मी सर्व विसरून गेलो. ती थोडा वेळ थांबली आणि माघे झाली.
मी खूप घाबरलो तिला आवडल नाही आता ती मला भांडेल पण ती काहीच बोलली नाही फक्त मला माघे ढकलून ती बाजूला झाली.
स्वप्न |
तो मोहक प्रसंग मला हाताळता आला नाही कि जे केल ते बरोबर केल ते आता पर्यंत मला कळले नाही.
पण त्या प्रसंगा ने मला जाग आली आणि स्वतःवर खूप हसत होतो...
खऱ्या आयुष्यात हा प्रसंग मला कधी अनुभवयाला मिळालाच नाही.
लोक म्हणतात सकाळी पाहिलेलं स्वप्न खरं होतात.
होईल का माझ स्वप्न खरं....
0 Comments