गोंधळातल प्रेम
तुझ्याकडे पाहून मी काही बोलत नाही, बोलू तरी काय तू आहेस कशी !!!! पण आज तुला रडताना पाहून खूप वाईट वाटतं होत. तुला जवळ देखील घेता येत नाही. मला तुला खूप लांब ठेवायचं होत पण ते माझ्याने होतच नाहीये.... काय करू सांगशील का???
मला माहित आहे ग तुला नसेल मी आवडत, मला देखील कुठे माहित आहे नेमकी काय वाटतं तुझा बदल मला!!!!! मी तुझा जवळ यावं म्हणून सर्व गोष्टी सांगत आलो अगदी मी विचार काय करतो ते मला देखील...
कुठल्या पण नात्याची ओळख न काही लपवता झाली पाहिजे असं वाटतं होत म्हणून तुला सर्व सांगत आलो आहे. मला माहित नाही माझ्या वागण्या मध्ये काय चुकत आहे, काळजी तर सर्वांची करतो पण तुला मी आवडत नाही!!!! माझ्या कडे नाहीत पैसे वैगेरे पण तू मला पैश्याने तोलशील असं मला तरी वाटतं नाही आणि तस असेल तर या वर बोलून काही होणार नाही...
पण खरं सांगू मला नाही जमणार मला नाही राहवत ग..... तू रडलीस कि त्रास होतो ग.. मी तुला पाहताच सांगतो तू दुःखी आहेस पण या दुःखात मी तुझी साथ देऊ शकत नाही.... मी हे असं का लिहतोय मला देखील कळत नाही तुझा जवळ देखील यायला बघतोय आणि लांब पण जायला बघतोय.
अग तुझा वाढदिवसाच्या वेळेस एकदा सर्वात पहिले मला केक खाऊ घातलास.... असं का केलंस मी तर दूर राहणार होतो तू मला मित्र बनवतेस तुझ्या सोबत घालवलेले क्षण परत येणार नाही ते माझ्या आठवणीत राहतील.
तुला लग्नात काही तरी सांगणार होतो पण बोललो नाही, लवकरच तुझं पण लग्न होईल ना ग..... !!!! मी खरंच काही पण कारण काढून पळून जाईन मला तुझा लग्नात भात नाही वाढायचा आणि तुला बघायला पण जमणार नाही..... तुला काय पाहिजे ते महिना भर आधीच सांगून ठेव मी देईन तुला घेऊन.
तू खूप गोड आहेस आणि तुला तुला एकट राहता येत नाही तुला कुणी ना कुणी सोबत पाहिजे असत, तुला शॉपिंग करायला खूप आवडत पण जुन्या साडी मध्ये देखील खूप सुंदर दिसतेस, चेहऱ्यावर फक्त एक हसू ठेव.....
तू आता पर्यंत खूप वेळेस सांगितलं आहेस चल पळून जाऊ पण चेष्टेत मनापासून बोलली असती तर तू माझी असती आता वेळ गेली आहे निघून आणि तू पण गेलीस निघून तरी का तुझा आठवणी येतात आणि तू समोर असल्याचा अनुभव करून देतात.....
आयुष्य भर तुझी आठवण
येणे हे माझे सुख आहे..
आयुष्य भर त्या आठवणी
मधली तू भेटली नाहीस हे माझे दुःख आहे.
आयुष्यात तू पुन्हा भेटणार नाही हे
मला माहित आहे.
पण आयुष्य आहे तो पर्यंत माझे तुझ्यावर
प्रेम आहे...
----- अजय गवळी


0 Comments